#IPL2019 : अखेर बंगळुरूला विजय गवसला

मोहाली -एबी डिव्हीलियर्स आणि कर्णधार विराट कोहली यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 8 विकेटस्‌ने मात करत सत्रातील पहिला विजय नोंदविला. 174 धावांचे आव्हान बंगळुरूने 19.2 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलच्या नाबाद 99 धावांच्या मदतीने 20 षटकांत 4 बाद 173 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल आणि विराट कोहली यांनी 43 धावांची सलामी दिली. आर. अश्‍विनने चौथ्या षटकात पार्थिव पटेलला अग्रवालकरवी झेलबाद केले. त्यानंतर कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करत विजयासमीप नेले. कोहलीने 53 चेंडूत 67 धावा केल्या. तर डिव्हिलीअर्सने 38 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या पंजाबची सुरुवात निर्णायक ठरली. सलामीवीर केएल राहुल आणि ख्रिस गेल आक्रमक खेळी करत 6 षटकांत दहाच्या सरासरीने संघाची धावसंख्या 60वर पोहोचविली. लोकेश राहुलच्या रूपात पंजाबला पहिला धक्‍का बसला. राहुल बाद झाल्यानंतर गेलने संघाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. एका बाजूकडून फलंदाज बाद होत असले तरी गेलने मात्र धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली.

आयपीएल-2019 गुणतालिका

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.