IPL 2024, Rajasthan Royals vs Mumbai Indians Match 38 : आज आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघ राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. उभय संघांमधील अखेरच्या सामन्यात राजस्थानने घरच्या मैदानावर मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला होता, तेव्हा गोलंदाजीतील उणीवा दूर करून यजमान मुंबई संघाचे बदला घेण्याकडे लक्ष असेल.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक ( Toss Update ) जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबई तीन बदलांसह प्रवेश करेल. आकाश मधवाल, रोमारियो शेफर्ड आणि श्रेयस गोपाल यांच्या जागी नुवान तुषारा, नेहल वढेरा आणि पियुष चावला आले आहेत. त्याचवेळी राजस्थानच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप सेनच्या जागी संदीप शर्माचे पुनरागमन झाले आहे.
🚨 Toss Update 🚨
Mumbai Indians elect to bat against Rajasthan Royals.
Follow the Match ▶️ https://t.co/Mb1gd0UfgA#TATAIPL | #RRvMI pic.twitter.com/WdVoFnAvuh
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2024
RR vs MI : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट सब : नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट सब : जोस बटलर, केशव महाराज, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर.
IPL 2024 : दाम कमी पण काम मोठे..! अवघ्या 20 लाखांत ‘हे’ खेळाडू करतायेत करोडोंची कामगिरी…
राजस्थानचा संघ यंदाच्या मोसमात 7 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मुंबई संघ 7 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, याच मोसमात मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत केवळ 4 गडी राखून लक्ष्य सहज गाठले. हा सामना जिंकून मुंबईला राजस्थानकडून मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे.