IPL Live Cricket Score, RCB vs PBKS Indian Premier League 2024 : फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचा सामना आज ( सोमवार, 25 मार्च) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शिखर धवनच्या पंजाब किंग्जशी होणार आहे. आरसीबीला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरूध्द पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर शनिवारी पीबीकेएसने दिल्ली कॅपिटल्सवर चार विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांचे प्लेईंग इलेव्हन कसे असू शकतात ते जाणून घेऊया.
आरसीबीच्या नजरा पहिल्या विजयाकडे
आरसीबीच्या पहिल्या सामन्यात संघाच्या मधल्या फळीला विशेष काही करता आले नाही. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रजत पाटीदारसारख्या फलंदाजांना पीबीकेएसविरुद्ध मोठी खेळी खेळावी लागणार आहे. याशिवाय अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्युसनला संधी मिळू शकते.
पंजाब किंग्जला जिंकायचा आहे दुसरा सामना…
पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या पीबीकेएसचा संघ विजयी प्लेइंग इलेव्हनसह आरसीबीचा सामना करू शकतो. शिखर धवनकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. यासह कागिसो रबाडासारखा अनुभवी वेगवान गोलंदाज आरसीबीविरुद्ध चांगली कामगिरी करू इच्छितो.
दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग 11 खालीलप्रमाणे –
पंजाब किंग्ज (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
IPL 2024 (#RRvLSG Match 4) : राहुल-पूरनची अर्धशतके व्यर्थ, लखनौनं जिंकलेला सामना गमावला….
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर आणि मोहम्मद सिराज.