Indian Premier League 2024, (RCB vs PBKS) Live Cricket Score : आरसीबीला त्यांच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता, तर पंजाबने लीगच्या 17व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून त्यांच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली होती.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये, सोमवारी, होळीच्या दिवशी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा संघ पंजाब किंग्जच्या संघाशी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पंजाबने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या आणि आरसीबी समोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने 37 चेंडूत 5 चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 45 धावा केल्या. सॅम कुरनने 17 चेंडूत तीन चौकारासह 23 आणि जितेश शर्माने 20 चेंडूत 1 चौकार अन् 2 षटकारासह 27 रन्सची इनिंग खेळली. बेअरस्टो सहा चेंडूंत आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर लिव्हिंगस्टोन 13 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.
Innings Break!
20 runs from the final over powers @PunjabKingsIPL to 176/6 🔥
Will it be enough or @RCBTweets will chase this down?
Scorecard ▶️ https://t.co/cmauIj3e0o#TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/QdlgTDD2vk
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2024
अखेरीस सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शशांक सिंगने एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 8 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. त्याचवेळी हरप्रीत ब्रारही दोन धावा करून नाबाद राहिला. शेवटचे 20 वे षटक अल्झारी जोसेफने टाकले. या षटकात एकूण 20 धावा आल्या. यात शशांक सिंगने दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…
आरसीबीतर्फे गोलंदाजीच ग्लेन मॅक्सवेलनं 3 षटकात 29 धावा देताना 2 गडी तर मोहम्मद सिराजने 4 षटकात 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त अल्ज़ारी जोसेफ आणि यश दयाल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.