Rohit Sharma Sets Unwanted Record in IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 20 षटकांत 9 बाद 125 धावाच करता आल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला.
दरम्यान, या सामन्यात आरआरचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 धावांत चार विकेट गमावल्याने त्याचा निर्णय योग्य ठरला. मुंबईच्या आघाडीच्या चार फलंदाजांपैकी तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. रोहित शर्मा, नमन धीर आणि देवाल्ड ब्रेविस यांना खातेही उघडता आले नाही. तर इशान किशन 16 धावा करून बाद झाला. आयपीएलमध्ये ही सहावी वेळ आहे, जेव्हा संघाचे अव्वल चार फलंदाजांपैकी तीन फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. त्याचवेळी रोहितने एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला.
रोहित आयपीएलमध्ये 17व्यांदा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. या बाबतीत तो दिनेश कार्तिकसह टॉपवर पोहोचला आहे. कार्तिकही 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. दुसऱ्या स्थानावर संयुक्तपणे चार फलंदाज आहेत. ग्लेन मॅक्सवेल, पियुष चावला, मनदीप सिंग आणि सुनील नरेन प्रत्येकी 15-15 वेळा खाते न उघडता बाद झाले आहेत.
IPL 2024 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक झाला बदल, ‘या’ सामन्यांच्या बदलल्या तारखा; जाणून घ्या कारण….
सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहितला ट्रेंट बोल्टने यष्टिरक्षक सॅमसनकरवी झेलबाद केले. रोहित आयपीएलमध्ये पाचव्यांदा बोल्टच्या चेंडूवर बाद झाला. त्याने आयपीएलमध्ये या किवी गोलंदाजाविरुद्ध 52 चेंडू खेळले असून 69 धावा केल्या आहेत. बोल्टने हिटमॅनला पाचवेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.