Yogi Adityanath On Rahul Gandhi – लोकसभा निवडणुकीसाठी चंडीगड येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
जेंव्हा देशावर कोणते संकट येते तेंव्हा सर्वप्रथम राहुल गांधी देश सोडून बाहेर पळून जातात. कॉंग्रेसनेच देशाला दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार आणि अराजकता दिली आहे अशी गंभीर टीका योगी यांनी केली.
चंडीगड येथून भाजपने संजय टंडन यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे मनिष तिवारी रिंगणात आहेत. योगी म्हणाले की जेंव्हा करोना आला तेंव्हा भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. गावागावांत गेले.
मात्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी चंडीगडला आले नाहीत, कोणत्याही गावात ते दिसले नाहीत. करोनाचे संकट आले तेंव्हा आम्ही एक कोटीपेक्षा जास्त लोकांना उत्तर प्रदेशात परत आणले. त्यावेळीही कॉंग्रेसचे नेते कुठे दिसत नव्हते.