Live Cricket Score, LSG vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 11 वा सामना शनिवारी (दि.30) पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला.
आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव केला. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत आठ गडी गमावून 199 धावा झाल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने दमदार सुरुवात केली मात्र संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 177 धावा केल्या. पंजाबकडून शिखर धवनने 70 धावांची दमदार खेळी केली. तर लखनौकडून मयंक यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने दमदार सुरुवात केली. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी झाली. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मयांक यादवने लखनौला पहिले यश मिळवून दिले.
त्याने 12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बेअरस्टोला स्टॉइनिसकरवी झेलबाद केले. त्याला 29 चेंडूत 42 धावा करता आल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि तीन षटकार आले. यानंतर प्रभसिमरन सिंग 19 धावा करून बाद झाला. मयंक यादवने त्यालाही आपला शिकार बनवले. एवढेच नाही तर जितेश शर्मालाही या घातक गोलंदाजाने बाद केले. या सामन्यात त्याने ताशी 150 किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत पंजाबच्या पकडीतून सामना हिसकावून घेतला.
त्याचबरोबर मोहसीन खाननेही संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आधी कॅप्टन धवनला आपला शिकार बनवले. यानंतर पुढच्याच चेंडूवर सॅम करनलाही बाद करत माघारी पाठवले. धवनने 50 चेंडूत 70 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि तीन षटकार आले. तर करणला एकही धाव करता आली नाही. या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोन 28 धावांवर तर शशांक सिंग नऊ धावांवर नाबाद राहिला. मयंकला त्याच्या घातक गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तत्पूर्वी, या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्विंटन डी कॉकच्या झंझावाती खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जला 200 धावांचे लक्ष्य दिले. लखनौने 20 षटकांत आठ गडी गमावून 199 धावा केल्या. डी कॉक आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी झाली, जी चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने मोडली. त्याने केएल राहुलला आपला बळी बनवले. त्याला केवळ 15 धावा करता आल्या. या खेळीदरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 शानदार षटकारही लगावला.
देवदत्त पडिक्कलचा खराब फॉर्म कायम राहिला, तो केवळ 9 धावा करून बाद झाला. त्याला सॅम करनने बाद केले. सहाव्या षटकाच्या सुरुवातीला 45 धावांवर एलएसजीने 2 महत्त्वाचे विकेट गमावले होते. मार्कस स्टॉइनिसने 2 शानदार षटकार ठोकून लखनौसाठी मोठ्या धावसंख्येच्या आशा उंचावल्या, पण तो 12 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.
#LSG batters demonstrating opening, supporting and finishing acts 👌
They set #PBKS a target of 2️⃣0️⃣0️⃣
Will it be chased or defended? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL | #LSGvPBKS pic.twitter.com/u73MTPVCeC
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
दरम्यान, निकोलस पूरन क्रीजवर आला, त्याची क्विंटन डी कॉकसोबतची भागीदारी पंजाबच्या अडचणीत वाढ करत होती, पण त्यानंतर 54 धावांच्या स्कोअरवर क्विंटन डी कॉकने आपली विकेट गमावली. त्याने 38 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. 15 षटकांत संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा होती.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी BCCI ‘या’ 15 खेळाडूंची करू शकते निवड, पहा यादी…
त्यानंतर कागिसो रबाडा 16 वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर पूरनला बाद केले. पुरनने 21 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार लगावत 42 धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये क्रुणाल पांड्या नावाचं वादळ आलं. वेगवान किंवा संथ चेंडू असो, क्रुणाल कोणालाही सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. पंड्याने 22 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी खेळली आणि एलएसजीला 20 षटकात 199 धावांपर्यंत नेले. त्याचवेळी रवी बिश्नोईला खातेही उघडता आले नाही. या सामन्यात मोहसीन खानने दोन धावा केल्या तर नवीन उल हक एकही धाव न काढता नाबाद राहिला.
शेवटच्या 9 षटकात 104 धावा…
11व्या षटकापर्यंत लखनौ सुपर जायंट्सची धावसंख्या 3 बाद 95 धावा होती. मात्र अखेरच्या 9 षटकांत निकोलस पुरन आणि कृणाल पांड्या यांच्या स्फोटक खेळीमुळे एलएसजीच्या फलंदाजांनी 104 धावा केल्या. लखनौच्या फलंदाजांनी या डावात 10 गगनचुंबी षटकार मारून पंजाबच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
अर्शदीप सिंग, राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. पंजाबसाठी अर्शदीप सिंग आणि राहुल चहर यांनी महत्त्वाच्या विकेट घेतल्या, पण त्यांची खूप धुलाई झाली. पंजाबकडून सॅम करनने तीन आणि अर्शदीप सिंगने दोन तर कागिसो रबाडा आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.