T20 World Cup 2024, India Probable Squad : आगामी T20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर 1 जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. भारत अ गटात असून त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. विश्वचषक संघातील अनेक खेळाडूंचे स्थान निश्चित झाले असले तरी आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडू संघात स्थान मिळवू शकतात.
भारताच्या निवड समितीचे आयपीएल सामन्यांवर बारीक लक्ष आहे. टी-20 विश्वचषकासाठी निवडकर्ते अनेक खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत, तर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या आयपीएल कामगिरीचा संघातील निवडीवर काहीही फरक पडत नाही कारण त्यांची संघात निवड होणारच आहे. चला तर जाणून घेऊया, T20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संभाव्य संघ.
कर्णधार कोण असेल?
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय कर्णधार असेल याची पुष्टी केली आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो असे बोलले जात होते पण जय शाहने रोहितच कर्णधार असेल याची पुष्टी केली आहे.
यष्टिरक्षक कोण असेल?
केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचा यष्टीरक्षक म्हणून संभाव्य संघात समावेश केला जाईल ही शक्यता आहे. पण पंत दुखापतीनंतर पुनरागमन करत असल्याने त्याची आयपीएलमधील कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. केएल राहुलने पंजाब किंग्जविरुद्धही कर्णधारपद सोडले, त्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांना आपला दावा मजबूत करायचा असेल तर त्यांना आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
T20 विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ…
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, जसप्रीत बमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.