Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग दरवर्षी कमाई आणि प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. पहिल्या 10 सामन्यांमध्येच धावा आणि विकेटचे अनेक विक्रम मोडले गेले, तर आता IPL 2024 ने दर्शकांच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
आयपीएल 2024 चे पहिले 10 सामने डिस्ने स्टारवर सुमारे 35 कोटी यूजर्संनी पाहिले आहेत, जो स्वतःच एक रेकॉर्ड बनला आहे. त्याच वेळी, हंगामातील पहिल्या 10 सामन्यांमध्ये प्रेक्षकांनी सामने पाहण्यासाठी घालवलेल्या वेळेत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आयपीएल 2024 च्या पहिल्या 10 सामन्यांची पाहण्याची वेळ 8,028 कोटी मिनिटे आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. डिस्ने स्टार द्वारे आयपीएल 2024 ही 10 भाषांमध्ये 14 वेगवेगळ्या माध्यमांतून प्रसारित केले जात आहे. ब्रॉडकास्टरने मूकबधिर आणि दृष्टिहीन लोकांसाठी सांकेतिक भाषा देखील लागू केली आहे, ज्याचा थेट परिणाम दर्शकांवर झाला आहे.
आयपीएल 2024 हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने झाली. तो सामना 16.8 कोटी लोकांनी थेट पाहिला आणि त्याची पाहण्याची वेळ 1,276 कोटी मिनिटे होती. CSK vs RCB, हा देखील इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात जास्त पाहिला जाणारा सलामीचा सामना बनला आहे. लीग म्हणून आयपीएलमध्ये सातत्याने सुधारणा होत असल्याचे सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.
डिस्ने स्टारचे स्पोर्ट्स हेड संजोग गुप्ता म्हणाले, “टाटा आयपीएल 2024 साठी नवीन दर्शकांचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. डिस्ने स्टारने मागील हंगाम संपलेल्या ठिकाणापासून 17 व्या हंगामाची सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे या स्पर्धेबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह आहे.”