Indian Premier League 2024 Live Cricket Score, CSK vs GT : आज IPL 2024 च्या सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जात आहे. दोन्ही संघ आपापले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. अशा स्थितीत विजयाची घोडदौड कायम ठेवण्याकडे चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांच्या नजरा असतील. गेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला होता तर गुजरातने गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता.
तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभमनने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. नाणेफेकीच्या वेळी शुभमन गोंधळलेला दिसला. त्याने प्रथम फलंदाजी करायची असल्याचे सांगितले, पण नंतर निर्णय बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करेल.
🚨 Toss Update 🚨
Gujarat Titans win the toss and elect to bowl against Chennai Super Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/9KKISx5poZ#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/qk8xLYhUlH
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
त्याचवेळी, चेन्नईचा कर्णधार गायकवाडने सांगितले की, टाॅस जिंकला असता तर त्यानेही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. ऋतुराजने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. महेश तिक्षीनाच्या जागी मथिशा पाथीराना परतला आहे.
IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : किंग कोहलीने केली एम. एस. धोनीच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी…
दरम्यान, या सामन्यात प्रथमच कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या दोन कर्णधारांमध्ये स्पर्धा आहे. या मोसमापूर्वी गुजरातने शुभमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती केली. त्याचवेळी चेन्नईनेही हंगाम सुरू होण्याच्या एक दिवस आधी रुतुराजला कर्णधार बनवले. रुतुराजला टीम इंडियाचे कर्णधारपदाचा अनुभव आहे, मात्र त्याने कधीही आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलेले नाही. त्याचबरोबर शुभमन पहिल्यांदाच कोणत्याही संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि रुतुराज गायकवाड या दोन नवीन कर्णधारांच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी लागणार आहे.