Sunetra Pawar Facebook Post : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी केवळ बारामतीमध्येच नाही तर इतर तालुक्यांमध्ये देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सुनेत्रा पवार सध्या गावोगाव जाऊन दौरा करताहेत. मीडियाशी संवाद देखील साधताहेत. अशात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशात त्यांनी भावकी आणि महाभारताचा उल्लेख करत केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आलिया आहे. | Sunetra Pawar Facebook post
सुनेत्रा पवार यांची पोस्ट जशीच्या तशी..
“सारोळ्यात सगळेच एकवटले..!
अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले.सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले.
महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला २४ तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला. | Sunetra Pawar Facebook post
यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची दखल मी घेतली असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. ज्या ठिकाणी ही सदिच्छा भेट झाली ते ठिकाण पाहून मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली. | Sunetra Pawar Facebook post
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेना तालकाप्रमुख अमोल पांगारे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुनिल गायकवाड, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, बाळासाहेब गरुड, विद्याताई पांगारे, नीलम झांजले, अर्जुनराव अहिरे, गणेश निगडे, महेंद्र भोरडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे मनापासून आभार.”
धनुष्यबाण सोडत हाती घेतलं घड्याळ ! अखेर आढळरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश..