IPL 2024 , CSK vs RCB Live Cricket Score : आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना खेळला गेला.आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात केली.
प्रथम खेळताना आरसीबीने 20 षटकांत 6 बाद 173 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने 8 चेंडू राखून व केवळ चार विकेट्स गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. चेन्नईकडून रचिन रवींद्रने 37, अजिंक्य रहाणेने 27 धावा, शिवम दुबेने नाबाद 34 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 25 धावा केल्या.
आरसीबीने दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सीएसकेला पहिला धक्का कर्णधार रुतुराज गायकवाडच्या रूपाने बसला आहे. तीन चौकारांच्या मदतीने तो 15 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. यश दयाल याने ग्रीनकरवी त्याला झेलबाद केले. रुतुराज आणि रचिन रवींद्र यांच्यात पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी झाली.
त्यानंतर सीएसकेला 71 धावसंख्येवर रचिन रवींद्रच्या रूपाने दुसरा धक्का बसला. रविंद्रला करण शर्मानं रज्जत पाटीदार करवी झेलबाद केले. रविंद्रने 15 चेंडूत 3 चौकार अन् 3 षटकारासह 37 धावांची खेळी केली. 27 धावा करू शकणाऱ्या रहाणेच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला.तर संघाला चौथा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. 22 धावा करून तो बाद झाला. त्याला कॅमेरून ग्रीनने रजत पाटीदारच्या हाती झेलबाद केले.आरसीबीतर्फे कॅमेरून ग्रीनने 2 तर यश दयाल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, RCB ने CSK विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनुज रावत आणि दिनेश कार्तिक हे आरसीबीसाठी संकटमोचक ठरले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 57 चेंडूत 95 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 20 षटकात 6 बाद 173 धावांपर्यत मजल मारली.
Innings Break!
Anuj Rawat & Dinesh Karthik fire with the bat to power @RCBTweets to 173/6 🙌 🙌
Mustafizur Rahman stars with the ball for @ChennaiIPL 👌 👌
Stay Tuned for the #CSK chase ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/4j6FaLF15Y#TATAIPL | #CSKvRCB pic.twitter.com/OgVMjbwQiX
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
बंगळुरू संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र डु प्लेसिस बाद होताच संघ संघर्ष करताना दिसला. कोहली कठीण परिस्थितीत संघाला सांभाळण्यासाठी ओळखला जातो, मात्र तोही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकला नाही. 78 धावांवर संघाच्या पाच विकेट पडल्या होत्या. 12व्या षटकात मुस्तफिझूर रहमानने प्रथम विराट कोहली (21) आणि नंतर कॅमेरून ग्रीनला (18) बाद केले. आरसीबीची फलंदाजी ढासळली होती, पण सहा आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनुज आणि कार्तिकने दमदार कामगिरी करत सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. डू प्लेसिसने 23 चेंडूत 8 चौकारांसह 35 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. रजत पाटीदारचा खराब फॉर्म सुरूच आहे, जो केवळ 3 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला आणि ग्लेन मॅक्सवेलही पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. कॅमेरून ग्रीन अतिशय संथपणे खेळताना दिसला, त्याने 22 चेंडूत केवळ 18 धावा केल्या.
अव्वल फळी आणि मधली फळी कोसळल्यानंतर दिनेश कार्तिक आणि युवा खेळाडू अनुज रावत यांनी जबाबदारी स्वीकारली. अनुज रावतने 25 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर CSKचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक धोनीने त्याला धावबाद केले. तर त्याच वेळी, दिनेश कार्तिकने 26 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा काढल्या.
तुषार देशपांडे महागडा गोलंदाज ठरला कारण त्याने डावाच्या 18व्या षटकात 25 धावा दिल्या. देशपांडेने 4 षटकात 47 धावा दिल्या. रहमानने सीएसकेला चांगली सुरूवात दिली होती. मात्र शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यात सीएसकेचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. चेन्नई बेंगळुरूला 150 पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत रोखेल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. आरसीबीने 20 षटकात 173 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान याने 4 षटकात केवळ 30 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. तर दीपक चहरने 4 षटकात 37 धावा देत एक गडी बाद केला.