Indian Premier League 2024 (Live Cricket Score, CSK vs LSG) : आयपीएल 2024 मधील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने दमदार विजय नोंदवला. लखनौ संघाने 211 धावांचे लक्ष्य अवघ्या 19.3 षटकात पूर्ण केले. एलएसजीने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीची सुरुवात खूपच खराब झाली. क्विंटन डी कॉक शून्य आणि कर्णधार केएल राहुलने 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लखनौसाठी सर्वाधिक धावा मार्कस स्टॉइनिसने केल्या, ज्याने 56 चेंडूत शतक पूर्ण केले आणि 63 चेंडूंच्या खेळीत 124 धावा केल्या. या खेळीत स्टॉइनिसने 13 चौकार आणि 6 षटकारही मारले. निकोलस पुरनने 15 चेंडूत 34 धावा केल्या. मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांच्यात 70 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. शेवटच्या षटकांमध्ये दीपक हुडानेही 6 चेंडूत 17 धावांची तुफानी खेळी करत लखनौच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विशेषत: मोईन अली आणि तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगलेच महागात पडले. सीएसकेकडून मथिशा पाथिरानाने 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय दीपक चहर आणि मुस्तफिजुर रहमाननेही प्रत्येकी 1 बळी घेतला.शार्दुल ठाकूरने अवघ्या 3 षटकांत 42 धावा दिल्या.चेन्नईच्या गोलंदाजांनी शेवटच्या 27 चेंडूत 76 धावा दिल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 4 गडी गमावून 210 धावा केल्या. चेन्नईकडून सर्वाधिक धावा कर्णधार रुतुराज गायकवाडने केल्या, ज्याने 56 चेंडूत झंझावाती शतक झळकावले. त्याने या सामन्यात 60 चेंडूत 108 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
शिवम दुबेसोबतच्या त्याच्या 104 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नई सुपर किंग्जला 210 धावांपर्यंत मजल मारता आली. अजिंक्य रहाणे अवघ्या 1 धावा करून बाद झाल्याने सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही. तर डॅरिल मिशेलही केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 50 धावांत संघाचे 2 विकेट पडल्या होत्या. अशा स्थितीत रवींद्र जडेजानेही 19 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले.
एका बाजूने विकेट पडत होत्या, पण कर्णधार गायकवाड क्रीजवर भक्कमपणे उभा होता. 12 व्या षटकात 101 धावांवर रवींद्र जडेजाच्या रूपाने संघाची तिसरी विकेट पडली. मात्र येथून शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांच्या स्फोटक भागीदारीने एलएसजीच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. दोन्ही फलंदाजांनी मिळून पुढच्या 47 चेंडूत 104 धावा केल्या.
एकीकडे गायकवाडने शतक झळकावले, तर दुबेने अवघ्या 27 चेंडूत चौकार आणि षटकार लगावत 66 धावा केल्या. या झंझावाती खेळीत त्याने 3 चौकार आणि 7 षटकारही मारले. एमएस धोनी शेवटच्या चेंडूवर क्रीजवर होता, त्याला एकच चेंडू खेळता आला, त्याने चौकार मारून सीएसकेला 210 धावांपर्यंत नेले.
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी भारताचे टॉप 3 फलंदाज कोण असावेत, इरफान पठाणने व्यक्त केले मत…
शेवटच्या 5 षटकात 75 धावा…
विशेषत: दुसऱ्या टाइमआऊटनंतर सीएसकेच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. याच कारणामुळे चेन्नईने शेवटच्या 5 षटकात 75 धावा केल्या. दरम्यान, यश ठाकूरने 2 षटकात 35 धावा दिल्या होत्या. 19वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहसीन खाननेही 17 धावा दिल्या, त्याच षटकात शिवम दुबेने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एलएसजीच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर केवळ मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांना प्रत्येकी 1 बळी घेता आला.