मुंबई -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने एक अनोखी कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा सामन्याचा मानकरी पुरस्कार पटकावताना त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे. आयपीएल स्पर्धेत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयात कर्णधार रोहित शर्मानेही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार पटकावत त्याने धोनीला मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.