शारजा : – संजू सॅमसन आणि स्टीव स्मिथ यांच्या तडाखेबाज फलंदाजी नंतर शेवटच्या षटकांत जोफ्रा आर्चरने केलेल्या तूफान फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान राॅयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 217 धावांचे आव्हान ठेवले आहे.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान राॅयलने 20 षटकांत 7 विकेटच्या मोबदल्यात 216 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
राजस्थानकडून संजू सॅमसनने 32 चेडूंत 9 षटकार व 1 चौकारासह सर्वाधिक 74 धावांची तर स्टीव स्मिथने 47 चेंडूत 4 षटकार व 4 चौकारासह 69 धावांची खेळी केली. डेविड मिलर शून्यावर बाद झाला तर राॅबिन उथप्पा 5 आणि यशस्वी जैस्वाल केवळ 6 धावांवर माघारी परतला. त्यानंतर शेवटच्या षटकांत जोर्फा आर्चरने तूफान फटकेबाजी केली. त्याने 8 चेंडूत 4 षटकांराच्या मदतीने 27 धावा केल्या.
चेन्नईकडून गोलंदाजीत सॅम करनने 4 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याव्यतिरिक्त दिपक चहर, लुंगी एनगिडी आणि पियूष चावला यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. रविंद्र जडेजाने 4 षटकांत 40 धावा दिल्या, मात्र विकेट घेण्यात तो अपयशी ठरला.