नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी राहुल गांधी हे त्यांना घेऊन अमेरिकेला गेले होते. तथापि, आज सकाळी ते दोघेही मायदेशी परतले आहेत.
सध्या संसदेत शेतीविषयक विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या परतण्यामुळे आता कॉंग्रेस व मित्र पक्षांना बळ मिळणार आहे.
14 सप्टेंबरपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले त्याच्या आधीच हे दोघे मायलेक विदेशात गेल्याने त्यांना संसदेच्या महत्त्वाच्या कामकाजाला उपस्थित राहता आले नव्हते.
तथापि आता त्यांना उर्वरित कामकाजात सहभागी होता येणार आहे. 24 सप्टेंबरपासून कॉंग्रेसने अन्य विरोधीपक्षांच्या मदतीने शेतीविषयक विधेयकांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचे नेतृत्वही राहुल गांधी यांना करता येणार आहे.