शिवसेनेचे सर्व आमदारांना ओळखपत्रासह मुक्कामाला निमंत्रण

मुंबई: भाजप सेनेत काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेने आघाडीसोबत एक नवी सुरवात करण्याचे ठरविले असून त्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीतही मोठ्या घडामोडी घडत असंल्याचे पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगानेच शिवसेनेच्या सर्व आमदारांना येत्या २२ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची खलबते सुरु असतानाच इकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेची तयार सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. २२ तारखेला होणाऱ्या बैठकीस येताना आमदारांनी आधारकार्ड, ओळखपत्र आणि ५ दिवसांचे कपडेही सोबत आणायला सांगितले आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली असून, त्यासाठी दिल्लीत उद्या आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील बोलणी शिवसेनेसोबत होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.