नवी दिल्ली :- पी-नोट्सच्या माध्यमातून परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात शेअरचे व्यवहार करतात. डिसेंबरअखेर या गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होऊन 96,292 कोटी रुपये झाली. त्या अगोदर भारतीय शेअर बाजाराबाबत हे गुंतवणूकदार आशावादी होते. त्यामुळे जुलै महिन्यापासून या गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढत होती.
मात्र त्यानंतर डिसेंबर महिन्यात या गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केली.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या माध्यमातून परदेशातील किरकोळ गुंतवणूकदार पी- नोट्सचा वापर करून भारतीय शेअर बाजारात व्यवहार करीत असतात. नोव्हेंबरमध्ये या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक 99,315 कोटी रुपये होती.
डिसेंबर अखेरीस हे गुंतवणूक कमी होऊन 96,292 कोटी रुपये झाली आहे. हे गुंतवणूकदार शेअर बाजाराबरोबरच कर्जरोखे आणि हायब्रीड सिक्युरिटीज या क्षेत्रातही गुंतवणूक करीत असतात. परदेशी संसागत गुंतवणूकदार ज्या पद्धतीने गुंतवणूक करतात त्याच पद्धतीने पी- नोट्सच्या माध्यमातून गुंतवणूक होत असते. काही दिवसापासून परदेशी सस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून विक्री करीत आहेत. त्यामुळे पी- नोट्सच्या माध्यमातून होत असलेली गुंतवणूक कमी होत आहे.
‘गर्भधारणा चालू ठेवायची की नाही, हा अधिकार ‘त्या’ महिलेलाच! मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
गेल्या वर्षी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून बराच नफा काढून घेतला. आता भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जास्त आहेत. त्या तुलनेत इतर वेगाने विकसित होणाऱ्या देशाचे निर्देशांक कमी आहेत. अशा परिस्थितीत हे गुंतवणूकदार भारतातील गुंतवणूक तिकडे बळवत असल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले.