पुणे – प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेने मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली असून, एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
शहरातील 5 प्रमुख क्षेत्रिय कार्यालय परिसरात यात येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोलेरस्ता, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता भागात महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून 1 लाख 2 हजार नागरिकांची तपासणी केली आहे. त्यात 200 बाधित सापडले आहेत. महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
वरील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आठ प्रमुख झोपडपट्टी आहेत. या भागात करोना विषाणू प्रादुर्भाव अधिक आहे. येथील दाट वस्ती आणि झोपडपट्टी भागांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. तसेच या भागात ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन
करोना तपासणीसाठी महापालिकेला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, नर्स यांचा समावेश आहे. त्याकरिता नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.