फरीदाबाद – अग्निपथ योजनेच्या विरोधात हरियाणाच्या पलवलमध्ये झालेल्या तीव्र निदर्शनांतर फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगढ भागात मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित करण्यात आली आहे. तेथे निदर्शकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही करण्यात आला.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अफवांचा प्रसार रोखण्यासाठी हरियाणा सरकारने गुरुवारी संध्याकाळी मोबाइल इंटरनेट सेवा आणि मोबाइल नेटवर्कवर प्रदान केल्या जाणाऱ्या सर्व डोंगल सेवा तात्पुरत्या निलंबित करण्याचे आदेश दिले. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत म्हणून हा आदेश पुढील 24 तास लागू राहणार आहे.
अग्निपथ योजनेच्या विरोधात हरियाणाच्या पलवलमध्ये गुरुवारी निदर्शने झाली. यानंतर, पलवलमधील डीसी निवासस्थानावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी निवासस्थानावर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना इशारा देण्यासाठी हवेत गोळीबारही केल्याचे वृत्त आहे.