बारामती – सध्या बारामती नगरपालिकेने स्ट्रीट पोलवरून जाणाऱ्या टीव्ही व इंटरनेटच्या केबल कट करण्याचा धडाका लावला आहे. आतापर्यंत पाटस रोड, तीन हत्ती चौक माळावरची देवी, इंदापूर रोड या ठिकाणच्या केबल कट करण्यात आल्या आहेत.
वास्तविक या केबल कट करण्यापूर्वी केबल व इंटरनेट चालकांना नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे होते. तशी मागणी करणारे निवेदन देखील नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी श्री महेश रोकडे यांना ‘बारामती इंटरनेट व केबल असोसिएशन’ तर्फे देण्यात आले होते. पर्यायी व्यवस्थेच्या परवानगीबाबत अद्यापही निर्णय झाला नाही.
बारामती मध्ये दिनांक 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याकारणाने विविध साफसफाई रंगरंगोटी बरोबर केबल कट करणे ची कार्यवाही देखील सुरू आहे. जवळ पास 500 हून अधिक लोकांना इंटरनेट आणि केबल व्यवसायातून रोजगार प्राप्त होतो. बारामतीमध्ये 30 हजारांहूनही जास्त ग्राहक खाजगी कंपन्यांकडून इंटरनेट व टीव्ही ची सेवा वापरत आहेत. अचानक होणाऱ्या केबल कट च्या कारवाईमुळे ऐन दिवाळीत या सेवा खंडित झाल्याने ग्राहकांना नाहक त्रास भोगावा लागेल.
सदर केबल स्ट्रीट पोल वरून हटवून एखादी नवी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी याकरिता ‘बारामती इंटरनेट व केबल असोसिएशन’ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार असल्याचे प्रसिद्धीप्रमुख विजय रसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बारामती शहरातील केवल वायर ज्या आता लाईट या पोलवर टाकल्या आहेत त्या नगर परिषदेच्या सूचनेनुसार भूमिगत करण्यासाठी तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक या रोड़ वर मेन रोड आणि सर्व्हिस रोड यामधील जागेतून भूमिगत वायरिंग वत्यासाठीकरण्यासाठी नगर परिषद कडून विनाशुल्क लेखी परवानगी मिळावी अशी मागणी संघटनेने मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी स्वप्नील शिंदे, विकास घाडगे, हर्षद दलाई ,प्रफुल्ल जराड, संतोष वागजकर, दिमिषकुमार आदी उपस्थित होते.