कार्ला, (वार्ताहर) – महाशिवरात्रीनिमित्त तळ्याकाठी असणाऱया महादेवाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या वेळी भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
तलावा काठी असणाऱया पुरातन शिवमंदिरात अमोल हुलावळे तर गावातील शिव मंदिरात शिवशंकर मित्रमंडळाचे कुमार हुलावळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला होता. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी अमोल हुलावळे, मंगेश हुलावळे, सागर हुलावळे, काशिनाथ फाटक यांच्या वतीने फराळाच्या पदर्थांचे वाटप करण्यात आले.
या वेळी सुदाम हुलावळे, राजू हुलावळे, अनंता हुलावळे, प्रशांत हुलावळे, नंदकुमार हुलावळे, सुनील शिर्के, हनुमंत हुलावळे, सचिन वाडेकर, रोहिदास शिर्के, अनिल कांबळे, संतोष केदारी, रितेश वायकर, संतोष हुलावळे, कालिदास हुलावळे, विनोद हुलावळे, विनायक हुलावळे, गणेश हुलावळे यांनी संयोजन कले होते.