मुंबई – रिझर्व बँकेने सलग सातव्या पतधोरणात आपला रेपो हा मुख्य व्याजदर 6.5% या विक्रमी पातळीवर ठेवला आहे. सध्या या व्याजदरावरही घर खरेदी वाढली आहे. त्याचबरोबर नवीन घरी तयार होत आहेत. मात्र जास्त काळ व्याजदर उच्च पातळीवर ठेवून चालणार नाही. रिझर्व्ह बँकेने जून महिन्यातील पतधोरणात व्याजदर कपात करावी असा आग्रह विकसकांच्या संघटनांनी रिझव्हर्र् बँकेकडे केला आहे. (Interest rates should be cut in June; Realty sector urges Reserve Bank)
रिझव्हर्र् बँकेने आज पतधोरण जाहीर करताना सांगितले की, एप्रिल ते जून या कालावधीत सर्वसाधारण तापमानापेक्षा जास्त तापमान राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाईचा दर उच्च पातळीवर असताना व्याजदर कपात करणे बरोबर होणार नाही. त्यामुळे सध्या व्याजदर 6.5% या उच्च पातळीवर कायम ठेवावे लागले आहेत.
क्रेडाई या विकसकाच्या संघटनेचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले की, बँकेने केवळ व्याजदर उच्च पातळीवर ठेवलेले नाहीत तर आगामी काळातही व्याजदर याच पातळीवर राहण्याची अधिक शक्यता असल्याचे सूचित केले आहे. यामुळे केवळ घरनिर्मितीवरच नाही तर इतर क्षेत्रावरही परिणाम होणार आहे.
एकूण परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने जून मधील पत धोरणात व्याजदर कपातीच्या शक्यतेवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आम्हाला वाटते. सध्या महागाई 5% च्या जवळपास आहे आणि आगामी वर्षात ती साडेचार टक्क्यांच्य दरम्यान राहणार आहे असे रिझव्हर्र् बँकेने जारी केलेल्या पत धोरणात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात रिझव्हर्र् बँक व्याजदर कपातीच्या शक्यतेवर विचार करू शकते असे समजले जाऊ लागले आहे. सध्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर उच्च पातळीवर ठेवले असले तरी त्याचा देशातील गृहनिर्मिती आणि विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही. कारण अर्थव्यवस्था सध्याच्या परिस्थितीतही विस्तारत आहे. त्यामुळे लोकांना घर घेण्याची इच्छा आहे. मात्र व्याज दर कमी केले तर परिस्थिती अधिक सकारात्मक होईल असे अॅनारॉक या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.