पुणे – इलेव्हन स्ट्रायकर्स मॅनेजमेंट तर्फे पहिल्या किंग्ज् स्पोर्टस् करंडक अजिंक्यपद आंतरक्लब टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 9 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत इन्फिनिटी क्रिकेट मैदान, चांदे येथे होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संचालक आणि किंग्ज् स्पोर्टस् क्लबचे संचालक गिरीष जयवाल यांनी दिली.
त्यांच्याच हस्ते आज (मंगळवार) स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. पुणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 32 साखळी सामने होणार आहेत.
स्पर्धेचा उपांत्य फेरीचे सामने 28 नोव्हेंबर रोजी तर, अंतिम सामना 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेत एकूण अडीच लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला सव्वालाख रुपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला एक लाख रुपये आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.