लखनऊ : उत्तर प्रदेशातील थंडीची लाट मंगळवारी आणखी तीव्र झाली. कानपूरमध्ये पारा शून्य अंशावर आला होता. तर लखनऊमध्ये किमान तापमान 0.7 अंश नोंदवले गेले. भरीचमध्ये 0.2 तापमान होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
झासीचे तापमान 1.8 तर बाराबांकीचे तापमान 1.6 नोंदवले गेले. अमेठीतील फुरसतगंजमध्ये किमान तापमान 1.4 अंश होते. फतेहपूरमध्ये 2.2, सुतानपूरमध्ये 2.4 तर बरेलीमध्ये 2.6 आणि बांदामध्ये तीन अंश तापमान होते. तापमान कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. कानपूरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.