बेल्हे- स्वराज्य सोशल फाउंडेशन, अतुल भांबेरे मित्रमंडळ तसेच आमदार अतुल बेनके युवा मंच जुन्नर तालुका यांच्या वतीने गुळंचवाडी (ता. जुन्नर) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अनेक तरुणांनी तसेच तरुणींनी रक्तदान केले. या विधायक उपक्रमात तरुणींचा सहभाग लक्षवेधी ठरला आहे.
गुळंचवाडी छोटस गाव असले तरी येथील 51 जणांनी रक्तदान करून करोनाग्रस्तांसाठी योगदान दिले आहे. आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. करोनामुळे सर्व हॉस्पिटल आणि दवाखान्यात रक्तपुरवठा कमी पडत असल्याने राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले होते.
या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल भांबेरे व गुळंचवाडीतील युवकांच्या नेतृत्वाखाली शिबिर पार पडले. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी शिबिराला भेट दिली. रक्तसंकलन केलेल्या पिशव्या चाकण ब्लड बॅंक येथे देण्यात आले आहे.