चिंबळी- लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या कमगारांचे मोठे हाल होत आहेत. तर चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्येही मजूर म्हणून काम करणारे अनेक कर्मचारी हे परराज्यातील आहे. मात्र, या लॉक डाऊच्या पार्श्वभूमीवर त्यांना घरीही जाता येईना, अन् खिशात पैसे नसल्याने किराणामाल घेऊ शकत नसल्याने त्यांचे अन् कुटुंबाचे हाल होत होते. त्यामुळे मोई (ता. खेड) परिसरात चाकण वसाहतीत काम करणारे अनेक मजुर व त्यांचे कुटुंब भाड्याने घर घेऊन राहत आहेत, त्यांचे हाल होवू नये म्हणून सरपंच राहुल गवारी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी गोरगरिब मजुरांना तेल, साखर, तांदूळ, गहू, साबण, डाळ, भाजीपाला आदि वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी खेड तालुका शिवसेना उपप्रमुख किरण गवारे, मारूती येळवंडे, देवीदास मेदनकर, कैलास साकोरे, संतोष गवारे, सुखदेव फलके, रवी गवारे, मंगेश गवारे आदी उपस्थित होते.