नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात पायाभूत क्षेत्राची उत्पादकता वाढून 5.8 टक्के झाली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पायाभूत क्षेत्राची उत्पादकता 3.3 टक्क्यांनी कमी झाली होती.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये नैसर्गिक वायू, कोळसा, तेल शुद्धीकरण, सिमेंट क्षेत्राची उत्पादकता वाढली आहे. मात्र कच्चे तेल आणि खान क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये पायाभूत क्षेत्राची उत्पादकता 4 टक्क्यांनी वाढली होती. त्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बरीच वाढ झाली असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे एप्रिल ते फेब्रुवारी या महिन्यात पायाभूत क्षेत्राची उत्पादकता तब्बल 18 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या वर्षी या काळात या क्षेत्राची उत्पादकता 8.1 टक्क्यांनी कमी झाली होती.
सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये कोळसा क्षेत्राची उत्पादकता सहा टक्क्यांनी, नैसर्गिक क्षेत्राचे वायू क्षेत्राची उत्पादकता 12.5 टक्क्यांनी, तेल शुद्धीकरण क्षेत्राची उत्पादकता 7.8 टक्क्यांनी तर सिमेंट क्षेत्राची उत्पादकता पाच टक्क्याने वाढली आहे.