बंगळुरू – माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीला जून अखेरच्या तिमाहीत झालेला नफा ते 23 टक्क्यांनी वाढून 5,195 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीचा महसूल 18 टक्क्यांनी वाढून 27, 896 कोटी रुपये इतका झाला आहे.
आगामी काळात कंपनीने महसूल वाढण्याची शक्यता ताळेबंद जाहीर करताना व्यक्त केली. डिजिटल क्षेत्रात कंपनीला अनेक संधी निर्माण झाल्या असून या वर्षी जागतिक पातळीवर कंपनी 35 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी चालन अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले.
लॉकडाउन आणि निर्बंधामुळे गेल्यास एक वर्षामध्ये कठीण परिस्थिती असतानाही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली असल्यामुळे कंपनीचा ताळेबंद विस्तारत असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांनी सांगितले.