मुंबई – सॉफ्टवेअर क्षेत्रातील माईड ट्री या कंपनीने चमकदार ताळेबंद जाहीर केल्यामुळे कंपनीच्या शेअरच्या भावात बुधवारी नऊ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
जून अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या ढोबळ नफ्यात 61 टक्क्ची वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल वीस टक्क्यांनी वाढला आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात नव्यानेच आलेल्या या कंपनीने चांगली कामगीरी केली आहे.