India Women vs England Women Test Match Day 2 : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. भारताने सात बाद 410 धावांवरून दुसऱ्या दिवशी पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 18 धावा करताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. मुंबईत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 428 धावा करून ऑलआऊट झाली. या काळात दीप्ती शर्मा (67) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज(68)सह चार खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. हरमनप्रीत कौरचे अर्धशतक हुकले. ती 49 धावांवर बाद झाली. इंग्लंडकडून लॉरेन बेल आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
#TeamIndia post 4⃣2⃣8⃣ on the board! 👏 👏
6⃣9⃣ for Shubha Satheesh
6⃣8⃣ for @JemiRodrigues
6⃣7⃣ for @Deepti_Sharma06
6⃣6⃣ for @YastikaBhatiaOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/UB89NFaqaJ #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bK74CrsapP
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2023
सामन्याच्या पहिल्या दिवशी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा टीम इंडियासाठी सलामीला आल्या. यादरम्यान मंधानाने 12 चेंडूंचा सामना करत 17 धावा केल्या. तिने 3 चौकार मारले. शेफालीने 19 धावा केल्या. शुभा सतीश आणि जेमिमा यांनी चांगली भागीदारी केली. शुभाने 76 चेंडूंचा सामना करत 69 धावा केल्या. तिने 13 चौकार मारले. जेमिमाने 99 चेंडूत 68 धावा केल्या. तिने 11 चौकार मारले.
भारतीय कर्णधार हरमनप्रीतचे अर्धशतक हुकले. ती 49 धावा करून बाद झाली. हरमनप्रीतने 81 चेंडूंचा सामना करत 49 धावा केल्या. तिने 6 चौकार मारले. यास्तिका भाटियाने 88 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. दीप्ती शर्मानेही अर्धशतक झळकावले. तिने 113 चेंडूंचा सामना करत 67 धावा केल्या. स्नेह राणा 30 धावा करून बाद झाली. तिने 73 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले. पूजा वस्त्राकर 10 धावा करून नाबाद राहिली.
भारतासाठी शुभा आणि जेमिमा यांच्यात शतकी भागीदारी झाली. दोघींनी 146 चेंडूंचा सामना करत 115 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत आणि यास्तिका यांनी 116 धावांची भागीदारी केली.
इंग्लंडकडून लॉरेन बेलने 3 बळी घेतले. तिनं 19 षटकांत 67 धावा दिल्या आणि 3 मेडन षटकेही टाकली. एक्लेस्टोननेही 3 बळी घेतले. तिने 26.3 षटकात 91 धावा दिल्या. 5 मेडन षटके टाकली. केट क्रॉसने 14 षटकात 64 धावा देत 1 बळी घेतला. नेट सेव्हियरने 11 षटकांत 25 धावांत 1 बळी घेतला.