India Women vs England Women Test Match Day 2 Stumps : – दीप्ती शर्माने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने एकमेव कसोटीत इंग्लंड महिला संघाचा पहिला डाव अवघ्या 136 धावांत गुंडाळला व मोठी आघाडी घेतली. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या महिला संघाने आपल्या दुसऱ्या डावात 6 बाद 186 धावा केल्या असून आता त्यांच्याकडे एकूण 478 धावांची भक्कम आघाडी आहे.
𝗦𝘁𝘂𝗺𝗽𝘀!#TeamIndia finish Day 2 with a lead by 478 runs 👍
Captain @ImHarmanpreet remains unbeaten on 44 🙌#INDvENG pic.twitter.com/H47JvJKtPu
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2023
आता शनिवारी ते आपला दुसरा डाव किती धावांवर घोषित करतात यावर इंग्लंडसमोर किती धावांचे लक्ष्य दिले जाइल हे स्पष्ट होणार आहे. भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार हरमनप्रीत कौर व शेफाली वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत चमक दाखवली.
INDW vs ENGW Test Day 2 : जेमिमासह 4 खेळाडूंची अर्धशतके; भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 428 धावा…
त्यापूर्वी, गुरुवारच्या 7 बाद 410 धावांवरून शुक्रवारी पुढे खेळ सुरु झाल्यावर भारताचा पहिला डाव 428 धावांवर संपला. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव सुरु झाला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांवर जबाबदारीने फलंदाजी करण्याचे दडपण होते. त्याचा पुरेपुर लाभ घेत दीप्ती शर्माने आपल्या फिरकी गोलंदाजीवर त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली. दीप्ती व स्नेह राणा यांच्या ऑफ स्पीन गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या नावाजलेल्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.
INDW vs ENGW Test Day 2 : दीप्ती शर्माचा पंच, इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांवर आटोपला…
त्यांच्या नॅट शिव्हर ब्रंटचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ब्रंटने 59 धावांची खेळी केली. त्यात तीने 70 चेंडूत 10 चौकार फटकावले. मात्र, भारताच्या गोलंदाजीसमोर त्यांचा पहिला डाव अवघ्या 136 धावांवर संपूष्टात आला. भारताने त्यांना फॉलोऑन देण्याएवजी आपला दुसरा डाव सुरु केला. शेफाली वर्माने 33 तर स्मृती मानधनाने 26 धावा करत संघाला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, या दोघी परतल्यावर भारताची घसरगुंडी उडाली होती.
यस्तिका भाटीया व स्नेह राणा यांनी निराशा केली. कर्णधार हरमनप्रीत कौर मात्र, भक्कम फलंदाजी करत होती. तीने जेमिमा रॉड्रीक्स (27) सह संघाचे शतक फलकावर लावले. जेमिमा परतल्यावर दीप्ती शर्माने 20 धावांची खेळी केली. पुजा वस्त्रकारने नाबाद 17 धावा करत हरमनला साथ देत दीडशतकी पल्लाही पार करुन दिला. खेळ थांबला तेव्हा वस्त्रकारसह हरमनप्रीत 44 धावांवर खेळत आहे. भारताच्या दुसऱ्या डावात 6 बाद 186 धावा झाल्या असून त्यांच्याकडे 478 धावांची मोठी आघाडी आहे.
संक्षिप्त धावफलक –
भारत महिला संघ पहिला डाव – 104.3 षटकांत सर्वबाद 428 धावा. (शुभा सतीश 69, जेमिमा रॉड्रीक्स 68, दीप्ती शर्मा 67, यस्तिका भाटीया 66, हरमनप्रीत कौर 49, लॉरेन बेल 3-67, सोफी एक्केलस्टोन 3-91 ).
इंग्लंड महिला संघ पहिला डाव – 35.3 षटकांत सर्वबाद 136 धावा. (नॅट शिव्हर ब्रंट 59, दीप्ती शर्मा 5-07, स्नेह राणा 2-25).
भारत महिला संघ दुसरा डाव – 42 षटकांत 6 बाद 186 धावा. (शेफाली वर्मा 33, जेमिमा रॉड्रीक्स 27, स्मृती मानधना 26, दीप्ती शर्मा 20, हरमनप्रीत कौर खेळत आहे 44, पुजा वस्त्रकार खेळत आहे 17, शार्लेट डीन 4-68, सोफी एक्केलस्टोन 2-76).