Pro Kabaddi 2023-24 (Mumbai):– प्रो-कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्स संघाने तेलगु टायटन्स संघाचा 46 विरुद्ध 26 असा सहज पराभव केला. या विजयात बंगाल संघाचे नितिन कुमार, वैभव गर्जे व शुभम शिंदे विजया शिल्पकार ठरले. या कामगिरीमुळे बंगाल संघ या स्पर्धेत पून्हा विजयाच्या मार्गावर परतला.
या सामन्याला प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या मिनिटापासून बंगाल वॉरियर्सने वर्चस्व राखले. त्यांनी तेगलु टायटन्सच्या खेळाडूंवर इतके दडपण टाकले होते की त्यांना पकडी तर करता आल्याच नाहीत परंतू बचावही भक्कम राखता आला नाही. त्यांनी महत्वाच्या क्षणी रेड गुणही गमावले. पहिले सत्र संपले तेव्हा बंगाल संघ २७-१० असा भक्कम आघाडीवर होता. त्यात बंगालकडून नीतीन कुमारने ७ तर, वैभव गर्जेने ६ गुण मिळवत मालाची कामगिरी केली. त्यातही बंगालने या सत्रात तब्बल १४ रेड तर ६ टॅकल गुणांची कमाई केली. या उलट तेलगु संघाला रेडचे ६ तर टॅकलचे केवळ २ गुण मिळवता आले. त्यांचे स्टार खेळाडू पवन शेरावत (४) व संदीप कुमार (३) हे साफ अपयशी ठरत होते.
The Titans Challenge, conquered ✅🔥
Vaibhav Garje and Nitin Kumar inspire Bengal Warriors to a 20-point success against Telugu Titans 🫡
For more updates, download the Pro Kabaddi Official App or visit https://t.co/cfORnVakqn! pic.twitter.com/VX6SfzHlSO
— ProKabaddi (@ProKabaddi) January 9, 2024
हेच सातत्य बंगाल संघाने दुसरे सत्र सुरु झाल्यावरही राखले. मात्र, यावेळी तेलगु संघानेही जिद्दी लढत देत ही आघाडी २४-३३ अशी कमीकरताना बंगाल संघावरही दडपण टाकले होते. या सामन्यात अचानक रंगत निर्माण झाली होती. पवने लागेपाठ सहा गुणांची कमाई करताना तेलगु संघाला सामन्याच संधीही निर्माण केली होती.
#PKLSeason10 (#BLRvPAT Match 62) : बेंगळुरू बुल्सने शेवटच्या क्षणी गमावलेला सामना जिंकला…
मात्र, गर्जे, नितिनसह विश्वासनेही अफलातून पकडी केल्या तसेच संघाला सर्वबादचे महत्वाचे गुण मिळवून दिले. शुभम शिंदनेही त्यांना सुरेख साथ दिली. बंगालच्या संघाने तेलगु संघाचे गडी सातत्याने बाद केले व आपली आघाडी वाढवली. या तिघांचीच कामगिरी या सामन्यात निर्णायक ठरली. हा सामना बंगाल संघाने ४६ विरुद्ध २६ असा मोठ्या फरकाने जिंकला.