कटक : भारतीय संघाने बुधवारी दुस-या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी मात केली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता २२ डिसेंबरला होणा-या वन-डे ला फायनलचे स्वरूप आले आहे.
पण त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज दीपक चहर याला तिस-या वन-डे सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे. त्याच्याजागी आता नवदीप सैनी याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
UPDATE: Deepak Chahar has been ruled out of the 3rd @Paytm #INDvWI ODI. Navdeep Saini replaces him.
Details – https://t.co/7vL5GJobTU pic.twitter.com/QbHQL1KMyY
— BCCI (@BCCI) December 19, 2019
बीसीसीआयने गुरूवारी सांगितले की, ‘ दीपक चहरने बुधवारी झालेल्या वन-डे सामन्यानंतर पाठ दुखापतीच्या त्रासाची तक्रार वैदयकीय पथकाकडे केली, त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्याला पूर्णपणे ठीक होण्याकरिता काहीकाळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे.’
त्यामुळे त्याला तिस-या वन-डे सामन्यास मुक्कावे लागणार आहे.
चहर याने नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरूध्दच्या तिस-या टी-२० क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती, अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. याशिवाय याच सामन्यात त्यांन ३.२ षटकांत अवघ्या ७ धावा देत ६ विकेट घेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा विक्रम केला होता.
तर नवदीप सैनीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पणातच चमकदार कामगिरी करत विंडीजचे ३ फलंदाज बाद करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. तसेच याच टी-२० मध्ये भारताकडून २० वे षटक निर्धाव टाकणारा सैनी हा पहिला गोलंदाज ठरला होता.
तिस-या वन-डे साठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी