पुणे: नागरीकत्व विधेयकाच्या समर्थनात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केले. देशभरात नागरीकत्व विधेयकावरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
देशभरात मात्र कायद्याला विरोध होत असून हिंसाचार सुरु आहे. मुंबईतही नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात हजारोंच्या संख्येने सहभागी होत मुंबईकर आंदोलन करत आहेत.