India vs Australia T20 Series : ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतात भारताविरुद्ध होत असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सरस खेळ केलेल्या सलामीवीर डेव्हीड वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे.
वॉर्नरच्या जागी अष्टपैलु ऍरोन हार्डीला स्थान दिले आहे. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत वॉर्नरने 535 धावा केल्या आहेत. मात्र, त्यानेच मंडळाकडे या मालिकेसाठी विश्रांती मागितली होती. या मालिकेसाठी मॅथ्यु वेड याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, विश्वकरंडक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारतात भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती व विश्वकरंडक संपल्यावर टी-20 मालिकाही आता वेळापत्रकानूसार होणार आहे.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
(सर्व सामने संध्यासाठी 7 पासून)
पहिला सामना – 23 नोव्हेंबर, विशाखापट्टणम
दुसरा सामना – 26 नोव्हेंबर, तिरुअनंतपूरम
तिसरा सामना – 28 नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथा सामना – 1 डीसेंबर, नागपूर
पाचवा सामना – 3 डीसेंबर, हैदराबाद
ऑस्ट्रेलियाचा संघ –
मॅथ्यु वेड (कर्णधार), ऍरोन हार्डी, जेसेन बेहेरडॉर्फ, सीन अबॉट, टीम डेव्हीड, नाथन एलिस, ट्रेव्हीस हेड, जोस इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टोनिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा.