पुणे – उधार दिलेले पैसे वसूल करण्यासाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपी गवंडी काम करतो, त्याने एकाला काही रक्कम उधार दिली होती.हे पैसे समोरचा व्यक्ती देत नसल्याने त्याने ओळखीच्या एका व्यक्तीकडून गावठी कट्टा घेतला होता. या कट्टयाचा धाक दाखवून पैसे वसूल करण्याचा त्याचा इरादा होता. (Pune Crime)
विजयकुमार तुळशीराम शिंदे (31 रा. भुगाव, ता. मुळशी ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना खबर मिळाली की, दरी पुलाजवळ एक व्यक्ती गावठी कट्टा घेवुन थांबला आहे, (pune news)
त्यानूसार सापळा रचून विजयकुमार शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत गावठी बनावटीचे पिस्तुल व काडतुस असा 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याने हा गावठी कट्टा पैसे उधार घेतलेल्या व्यक्तीला धमकावण्यासाठी बाळगला होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे