Indonesia Earthquake: इंडोनेशियात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. इंडोनेशियातील पापुआ भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
पापुआ राज्याची राजधानी जयपुराजवळ 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवल्याचे यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले. पापु्आ प्रांतातीची राजधानी जयपुरा येथील अबेपुराच्या इशानेकडे 162 किमी अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं. त्याची तीव्रता 10 किलोमीटर आहे. इंडोनेशियाच्या हवामान आणि भूभौतिक एजन्सीने सुनामीचा धोका नसल्याचे सांगितले आहे.
अबेपुरा इंडोनेशियातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. फेब्रुवारीमध्ये या भागात मोठा भूकंप आला होता. यावेळी तरंगणारे रेस्टॉरंट समुद्रात कोसळून चार लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियात २७० दशलक्षहून अधिक लोकसंख्येचा एक विशाल द्वीपसमूह आहे. रिंग ऑफ फायर वर याचे स्थित हा द्वीपसमूह असल्यामुळे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो.
या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी इंडोनेशियातील पश्चिम जावामधील सियांजूर शहरात किमान 331 लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 600 लोक जखमी झाले होते. त्यानंतर 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. 2018 च्या सुलावेसी भूकंप आणि त्सुनामी नंतर इंडोनेशियातील हा सर्वात प्राणघातक होता, ज्यामध्ये सुमारे 4,340 लोक मारले गेले.