इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग : दिल्लीकडून मुंबईचा पराभव

मुंबई  – मुंबईचे राजे संघाने तेलुगु बुल्स संघाला पराभूत करत इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चांगली सुरुवात केली. त्यांना आपल्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीकडून 35-56 असे पराभूत व्हावे लागले.

तेलुगु विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबई चे राजे संघाने चांगली सुरुवात करत सुरुवातीच्या मिनिटांमध्ये दिलेर दिल्ली संघाविरुद्ध चांगला खेळ केला. दिलजितने चढाईत दाखवलेली चमक आणि रवीच्या बचावाच्या जोरावर दिल्लीला सर्वबाद करत चौथ्याच मिनिटाला सामन्यात 10-2 अशी आघाडी घेतली.

यानंतर पहिल्या क्वॉर्टरमध्ये दिल्लीच्या संघाने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर दिल्लीच्या संघाने दोन गुणांची कमाई करत पहिल्या क्वॉर्टरअखेरिस 14-12 अशी आघाडी घेतली.दिल्लीच्या बचावासमोर दिलजितने एकाकी झुंज दिली. दुस-या क्वॉर्टरअखेरिस दिले दिल्ली संघाकडे 26-17 अशी आघाडी होती.

दिलेर दिल्लीचा कर्णधार सुनिल जयपालने तिस-या व चौथ्या क्वॉर्टरमध्ये संघाला आघाडी मिळवून देण्यात योगदान दिले. मुंबई चे राजे संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण, सुनिलने 15 गुण ( 11 चढाईत व 4 बचावात) मिळवले व मुंबईला दोनदा सर्वबाद केले त्यामुळे दिल्लीला 56-35 असा विजय मिळवून दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here