नगरमध्ये दोन दिवस बॅडमिंटनच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

नगर: अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा दि.13 व 14 जून रोजी वाडिया पार्क बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून नागपूर, परभणी व ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचे संघ निवडण्यात येणार आहेत.

निवड चाचणी स्पर्धा 17 व 19 वर्षाखालील मुले, मुली आणि पुरुष, महिला यांच्यासाठी होणार आहे. यासह 10,13 व 15 वर्षे वयोगटाआतील मुले व मुली यांची जिल्हा अजिंक्‍यपद स्पर्धाही होणार आहे. निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करून जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंना असोसिएशनतर्फे योनेक्‍स कंपनीचे 2 टि शर्ट, 1 शॉर्ट व किटबॅग देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा योनेक्‍स कंपनीच्या फिदर शटल वर होणार आहेत. स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.अशोक कोठारी व उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी निवड समितीसाठी अजित देशपांडे (पुणे) व सदानंद कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या नियमावालीनुसार होणार आहे. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज दि.1 जून पासून उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी व प्रवेश अर्जासाठी खेळाडूंनी असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद कुलकर्णी (मो.9423162632) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.