World Cup 2023 India vs Netherlands Match Live Score : विश्वचषक 2023 च्या 45व्या सामन्यात आज भारताचा सामना नेदरलँडशी होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला नेदरलँडविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात ही विजयी मोहीम कायम राखत देशवासीयांना दिवाळीची भेट द्यायची आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे तर नेदरलँड्स (IND vs NED) स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि हा त्यांचा शेवटचा सामना आहे.
भारतीय संघाने विश्वचषकातही सलग नऊ सामने जिंकलेले नाहीत. त्याचबरोबर विराट कोहलीला दिवाळीच्या दिवशी वनडेमध्ये शतक झळकावून एक मोठा विश्वविक्रम रचण्याची सुवर्ण संधी आहे. जर त्याने आज शतक केले तर तो केवळ सचिन तेंडुलकरला मागे सोडणार नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल.
IND vs NED Live : भारताला पहिला धक्का..
नेदरलँड्सविरूध्द 11.5 षटकात 100 धावसंख्येवर भारतानं पहिली विकेट गमावली. शुभमन गिल 32 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. वन मीकरेनने गिलला निदामनुरुकरवी झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. शुभमन गिलने 30 चेंडूत आपले 12 वे अर्धशतक पूर्ण केले. आता विराट कोहली रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या 1 बाद 104 इतकी झाली आहे.
Confident as ever 💪
Shubman Gill gets his 12th ODI half-century 👏👏#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/yAdO6IRyjn
— BCCI (@BCCI) November 12, 2023
पॉवरप्लेमध्ये भारताच्या 91 धावा…
भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 91 धावा केल्या होत्या.
दरम्यान, भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. टीम इंडिया मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघाविरुद्ध (15 नोव्हेंबर) सेमीफायनल खेळणार आहे. दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी आॅस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. तर यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.