अयोध्येमध्ये यंदाच्या दिवाळी देखील दीपोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. अयोध्येत दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे रामनगरी दिव्यांनी उजळून निघण्याची तयारी सुरू आहे. यावेळी अयोध्येच्या ५१ घाटांवर २४ लाख दिवे लावून विश्वविक्रम केला जाणार आहे. या वर्षी नगरीत २४ लाख दिवे लावून मागील वर्षीचा १५.७६ लाख दिव्यांचा विक्रम मोडणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि भारतातील ४१ देशांच्या दूतावासातील प्रतिनिधींसोबत या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस असणाऱ्या या कार्यक्रमाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने दिवे मोजणार आहे मुख्यमंत्री योगी यांच्या निर्देशानुसार दीपोत्सवाची सर्व तयारी करण्यात येत आहे. दीपोत्सवात २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक पुन्हा एकदा विश्वविक्रम करणार आहेत. हा दिव्योत्सव पाहण्यासाठी झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील आदिवासींसह विविध ठिकाणांहून लोक येणार आहेत.
दीपोत्सव साजरा करण्यासाठी झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील सुमारे ४८ आदिवासी लोक शनिवारी अयोध्येत पोहोचले आहेत. या जमातीचे लोक डोंगराळ भागात राहतात आणि दिव्याच्या भव्य उत्सवात सहभागी होण्यासाठी अनवाणी पायांनी अयोध्येत आले आहेत.
झारखंड राज्य श्री राम जानकी चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्टने त्यांना दीप उत्सवात सहभागी होण्यासाठी अयोध्येला पाठवले आहे. उद्या ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत त्यांच्या पारंपरिक पोशाखात दीपप्रज्वलन करतील. या कालावधीत रामायणातील थीम आणि सामाजिक संदेश दर्शविणारी 12 झलक सजवली जाणार आहे.
21 राज्ये आणि चार देशांतील सुमारे पंचवीशे कलाकार यात सहभागी होऊन रंगतदार देखावा तयार करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री योगी यांचे भाषणही होणार आहे. रामायणाच्या ग्लोबल एनसायक्लोपीडियाचे 20 प्रकाशित खंड यापूर्वी प्रकाशित केले जातील. या काळात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही होणार आहे.