वॉशिंग्टन – भारतात करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ अमेरिकेतील भारतीय नागरीक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून या प्रस्तावांना पािंठंबा देत आहेत. या दोन्ही प्रस्तावाच्या संबंधात जाणुनबुजून गैरसमज आणि हिंसाचार पसरवला जात आहे तो दूर करण्याची गरज असून हे दोन्ही प्रस्ताव देशहिताचेच आहेत असा दावा या विषयी निदर्शनांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी म्हटले आहे. भारतात या दोन्ही प्रस्तावाच्या विरोधात मोठी निदर्शने होत असली तरी अमेरिकेतील भारतीयांनी याला मोठी गर्दी करून आज पाठिंबा दर्शवला.
अमेरिकेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी भारतीयांच्या रॅली होत आहेत. सीएटल मध्ये व्हीक्टर स्टेईनब्रुएक पार्क येथे नुकतीच अशी रॅली आयोजित करण्यात आली होती. ऑस्टीन मध्ये 22 डिसेंबर रोजी रॅली आयोजित करण्यात आली होती. तर ह्युस्टनमध्ये भारतीय दुतावासासमोरही 20 डिसेंबर रोजी भारतीय नागरीक या कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. डब्लीन, ओहिओ, नॉर्थ कॅरोलिना, इत्यादी ठिकाणीही भारतीयांच्या अशा रॅली झाल्या आहेत.
येत्या काही दिवसांत डल्लास, शिकागो, सॅन फ्रांसिस्को, न्युयॉर्क, वॉशिंग्टन, ऍटलांटा, सॅन होजे इत्यादी ठिकाणीही नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या संबंधात मोदी सरकारला पाठिंबा दर्शवणारे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. भयग्रस्त इस्लामिक नागरीक आणि डाव्या विचारांच्या संघटनांनी भारतात या दोन्ही प्रस्तावांच्या विरोधात नाहक भीतीचे वातावरण निर्माण केले आहे असा अमेरिकेतील भारतीयांचा आरोप आहे.
आयोंजकांपैकी एक असलेले विनीत गोयल यांनी म्हटले आहे की मुस्लिमांना देशाबाहेर काढण्यासाठी एनआरसी लागू केली जाणार आहे हा खोटा प्रचार काही लोकांनी चालवला असून त्यामुळे देशाच्या हिताचे विशेषत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अत्याचारग्रस्त नागरीकांच्या हिताच्या तरतूदींना हेतुपुरस्सर विरोध केला जात आहे असे त्यांनी म्हटले आहे.