नवी दिल्ली – भारताची स्टार महिला रग्बीपटू अंतिमा कुमारी उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी आढळली आहे. त्यामुळे
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य समितीने (नाडा) तीच्यावर दोन वर्षाची बंदी घातली आहे.
रग्बी खेळाडूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी बंदी लावण्यात आलेली अंतिमा भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. अंतिमाचा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला होता. त्यापूर्वी तीची चाचणी गेतली गेली व त्यात तीने बंदी असलेले टॅमोक्सिफेन द्रव्य सेवन केल्याचे आढळून आले. जागतिक उत्तेजन द्रव्य विरोधी समितीने (वाडा) 2021 साली या द्रव्याचा एस 4 अंतर्गत बंदी असलेल्या द्रव्यात समावेश केला आहे.