Stock Market updates – मंगळवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अशुभ ठरले आहे. प्रॉफिट बुकींगमुळे निर्देशांकात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये जास्तीत जास्त नफा बुक केला आहे, ज्यामध्ये गेल्या दोन सत्रांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 199 अंकांच्या घसरणीसह 73,128 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65 अंकांच्या घसरणीसह 22,032 अंकांवर बंद झाला.
बीएसईचे मार्केट कॅप घटले –
शेअर बाजारातील विक्रीमुळे बाजारातील बाजार भांडवल घसरले आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे बाजार भांडवल 375.02 लाख कोटींवर आले आहे जे मागील सत्रात 376.14 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.12 लाख कोटी रुपयांची घट दिसून आली.
आजच्या व्यापार सत्रात एफएमसीजी, धातू, मीडिया, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले. सकाळी तेजीत व्यवहार करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 11 वाढीसह आणि 19 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 16 समभाग वाढीसह आणि 34 समभाग तोट्यासह बंद झाले.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स –
आजच्या व्यवहारात टाटा स्टील 1.70 टक्के, टायटन कंपनी 1.61 टक्के, मारुती सुझुकी 1.13 टक्के, आयटीसी 1.01 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.92 टक्के, लार्सन 0.88 टक्के, टाटा मोटर्स 0.81, एशियन पेंट्स 0.72 टक्के वाढीसह बंद झाले. तर एचसीएल टेक 2.05 टक्के, विप्रो 1.93 टक्के, एनटीपीसी 1.84 टक्के, रिलायन्स 1.43 टक्के घसरणीसह बंद झाले.