फेसबुकवर ओळख झालेल्या युवकाबरोबर फैझलाबादला जाण्याचा प्रयत्न, सुरक्षा दलांनीकडून “घरवापसी’
लाहोर : कर्तारपूर कोरीडोरद्वारे पाकिस्तानात गेलेल्या एका शिख युवतीने फेसबुकवर मैत्री झालेल्या पाकिस्तानातील नागरिकासोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ताब्यात घेण्यात आले.
सुखबीर कौर (नाव बदलले आहे) या 20 वर्षांच्या युवतीची पाकिस्तानातील एकाशी फेसबुकवर मैत्री झाली. गुरूद्वारा दरबार साहिबच्या दारात त्याच्याशी सुखबीरची भेट झाली. त्यानंतर तिने पाकिस्तानी महिलेचा परवाना दाखवून फैझलाबादमध्ये प्रवेश करण्याच प्रयत्न केला.
भारतीय यात्रेकरूंना गुरू नानक देव देव यांचे अंतीम काळात वास्तव्य असणाऱ्या गुरूद्वारा दरबारसिंहमध्ये दर्शनासाठी व्हिसाशिवाय जाण्याची मुभा आहे. मात्र त्यांना पाकिस्तानातील अन्य भागात जाण्याची परवानगी नाही. नऊ नोव्हेंबरला हा कोरीडोर खुला झाल्यानंतर अशा स्वरूपाची पहिलीच घटना घडली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या युवतीला पाकिस्तानी माणसासोबत फैझलाबादला जायचे होते. मात्र त्याला सुरक्षा जवानांनी नकार दिला. पाकिस्तानातील सुरक्षा दलांनी तिची परत पाठवणी केली असून भारतीय दलांना याची माहिती दिली. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी एका महिलेसह तीन जणांना या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांची काही तास कसून चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.