…अन पाठलाग करत दुचाकीवरील तरुणीला दाखवला पॉर्न व्हिडीओ

…अन पाठलाग करत दुचाकीवरील तरुणीला दाखवला पॉर्न व्हिडीओ
पुणे: दुचाकीवरील तरुणीचा पाठलाग करत तीला पॉर्न व्हिडीओ दाखविण्याची घटना मुंढवा येथे घडली. संबंधीत तरुणी अभियंता असून कार्यालयात जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी पाठलाग करणाऱ्या अज्ञात तरुणाविरुध्द मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत दुचाकीस्वार तरुणाने तीच्या शरीराला स्पर्श करुन तीचा विनयभंगही केला.

यासंदर्भात एका 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. संबंधीत तरुणी एका नामांकीत कंपनीत अभियंता म्हणून काम करते. ती घटनेच्या दिवशी स्वत:च्या दुचाकीवरुन कार्यालयात चालली होती. रस्त्यात ओव्हरब्रीजजवळ दुचाकीवरुन एका तरुणाने तीचा पाठलाग केला. तीच्या गाडीचा वेग सिग्नलपाशी कमी होताच त्याने मोबाईलवर तीला पॉर्न व्हिडीओ दाखवला. तीने त्याकडे दुर्लक्ष करताच त्यांने विनयभंग केला. संबंधीत तरुणी अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रचंड घाबरली. तीने दुचाकी तशीच दामदट तेथून पळ काढला. याप्रकरणी संबंधीत तरुणीने तक्रार दाखल केल्यावर पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याव्दारे आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.