हिंजवडी – टपाल खात्यातील कर्मचार्यांच्या तंदुरुस्तीसाठी भारतीय टपाल विभागाचे वतीने घेण्यात येणार्या 37 व्या अखिल भारतीय पोस्टल अधिवेशनास पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून सुरुवात होत आहे.
30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आशा चार दिवसांत वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक या स्पर्धाचे आयोजन अखिल भारतीय टपाल विभागाच्या वतीने करण्यात आले. पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये आणि पुणे विभागाच्या पोस्टल सर्व्हिसेसच्या डायरेक्टर सिमरन कौर यांनी पत्रकारांना दिली.
सलग चार दिवस चालणार्या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि. 30) सकाळी 10 वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत तसेच टपाल खात्याचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या आधीची 36 वी अखिल भारतीय पोस्टल वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे झाली होती. यापूर्वीच्या स्पर्धेतील अनेक खेळाडूंनी टपाल खात्यात काम करताना राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचे अनुभव विशद केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळविलेली पदक व त्यांच्या कामगिरीबद्दलचे किस्से यावेळी कथन केले.
या वेळी खेळाडूच्या प्रशिक्षकांसह टपाल विभागाच्या प्रवर अधीक्षक रिपन ड्युलेट, सहायक पोस्ट मास्टर जनरल ए. जी. पाखरे, वरिष्ठ अधीक्षक अभिजीत इचके, सहायक संचालक वाय. आर. वाळूजकर, शरद वांगकर, के. एस. पारखी उपस्थित होते. यंदा पुण्यात आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातील 15 राज्यातील जवळपास 150 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेते केंद्र सरकारच्या आंतर-विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील.तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शारीरिक स्पर्धकास यंदाचा डाक श्री पुरस्कार प्रदान केला जाईल.असेही जायभाये यांनी सांगितले.
स्पर्धांचा दिवसनिहाय कार्यक्रम
30 जानेवारीला – वजननिहाय 10 प्रकारांमध्ये वेट लिफ्टिंग स्पर्धा
31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला – 8 प्रकारांमध्ये वजननिहाय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा तसेच सायंकाळी सांस्कृतिक संध्या
2 फेब्रुवारीला – वजनाच्या 10 प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट शारीरिक स्पर्धा, त्यानंतर आर्म रेसलिंग डेमो आणि बक्षीस वितरणनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप.