Vidhan Parishad Election 2024| लोकसभा निवडणुकींनंतर विधान परिषदेच्या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता मनसेकडून विधान परिषद निवडणुकीत आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे.
लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधान परिषद निवडणुकीत मात्र उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेने आपल्या अधिकृत X अकाउंटवरून परिपत्रक जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
“सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे”, असं मनसेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी काही ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या.
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. @abhijitpanse pic.twitter.com/HhDzeihyde
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 27, 2024
कोण आहेत अभिजीत पानसे?
अभिजित पानसे हे राज ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात. पानसे हे व्यवसायाने निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकही आहेत. रेगे, ठाकरे, रानबाजार यासारखे त्यांचे चित्रपट आणि वेब सीरीज गाजले. अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिल्यामुळे मनसे कोकणा जम बसवण्यात यशस्वी होणार का? हे पहावे लागणार आहे.
निरंजन डावखरे यांचा पत्ता कट? Vidhan Parishad Election 2024|
तर दुसरीकडे, कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होते. ते राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्र आहेत. मात्र कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने डावखरे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारांना 31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर 10 जून रोजी अर्जाची छाननी होऊन 12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यानंतर 26 जून रोजी मतदान होईल आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. Vidhan Parishad Election 2024|
हेही वाचा: