नवी दिल्ली: भारतीय नौदलाने सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे. सैनिकाला ड्युटीवर असताना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. सैनिकांमार्फत सोशल माध्यमातून शत्रूला माहिती दिल्या गेल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आहे.
हा आदेश २७ डिसेंबर रोजी नवदलामार्फत जारी करण्यात आला. शत्रुंना माहिती पुरवल्याप्रकरणी २० डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्तचर विभागाने पाकिस्तानाशी संबंध ठेवणाऱ्या गुप्त रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
सोशल माध्यमावर बंदी घालण्यासह जहाजांवरदेखील स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंध्ये फेसबुक, वॉट्सअप, इंस्टाग्राम, मेसेजिंग ऍप आदींवर बंदी घालण्यात आली आहे.